औरंगाबाद - जिल्ह्यातील पाडेगाव येथे रिक्षा आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातातील दोनजण मृत पावले आहेत. तर चारजण गंभीररित्या जखमी आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औरंगाबादेत रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात दोन ठार, चार जण जखमी अंकुश केशवराव दाणे (21 औरंगाबाद) आणि नंदू प्रकाश नरवडे (33 बिडकीन, आंबेडकरनगर औरंगाबाद) असे अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. संगीता नंदू नरवडे (28), प्रज्ञा नंदू नरवडे (10), प्रतिज्ञा नंदू नरवडे (7), केशवराव खंडूजी दाणे (60) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा... महाठग! मेहुल चोक्सीकडून पंजाब आणि सिंध बँकेची ४४.१ कोटींची फसवणूक
दसऱ्याच्या दिवशी नंदू नरवडे हे पत्नी व दोन मुलींसह फिरायला वेरूळला निघाले होते. तर मृत अंकुश दाणे हे वडिलांसह औरंगाबादला रिक्षात बसून येत होता. याच दरम्यान दुपारच्या वेळेस नाशिक रोडवर देवगिरी हॉटेलजवळ दाणे बसलेल्या रिक्षा आणि नरवडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले होते. या सर्व जखमींवर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास दाणे आणि नरवडे या दोघांचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर