औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग झालेली एक महिला आता पूर्णतः बरी झाली असून संबंधित महिलेला डिस्चार्ज मिळाला आहे.
औरंगाबादेतील 'पॉझिटीव्ह' महिलेची कोरोनावर मात; डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे मानले आभार - aurangabad corona
कोरोनाचा संसर्ग झालेली प्राध्यापक महिला आता पूर्णतः बरी झाली असून संबंधित महिलेला डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर महिलेने डॉक्टरांचे तसेच देवाचे आभार मानले आहेत.
15 मार्चला जिल्ह्यातील एका प्रध्यापिकेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास दहा दिवसांनी उपचार घेतल्यानंतर आता संबंधित महिलेचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मात्र, डॉक्टरांनी किमान सात ते आठ दिवस घरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपल्यामुळे कोणालाही आजाराचा प्रादुर्भाव झाला नसेल ना, याची सतत भीती वाटत असल्याची भावना महिलेने व्यक्त केली. रशियातून परतताना खूप जास्त काळजी घेतली. मात्र, यानंतरही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. तसेच स्वत:ची काळजी घेत असल्याने कधीही कोरोना सारखा आजार होईल, असे वाटले नसल्याचे या महिलेने म्हटले. आजारी पडल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली. यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आल्याने धक्का बसल्याचे संबंधित महिलेने सांगितले. मात्र, आता या प्राध्यापिकेचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.