औरंगाबाद - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले असा आरोप करत काही समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, हे कार्यकर्ते भाजपचे नाहीच असे स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले आहे.
Aurangabad BJP Office : पंकजा मुंडे समर्थकांची औरंगाबादेतील भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी - पंकजा मुंडे समर्थकांची भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी
20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारास काही समर्थक उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर आले. पंकजा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी -20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारास काही समर्थक उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर आले. पंकजा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजप कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे कार्यकर्ते आले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्याकडून देण्यात आली.
हे कार्यकर्ते आमचे नाहीत - भाजप कार्यालयावर हल्ला करण्यासाठी येणारे लोक भाजपचे किंवा पंकजा मुंडे यांचे नाहीत, असे स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले. भाजप चांगलं काम करत आहे. त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणीतरी या लोकांना पाठवले आहे. हे कोणत्याही पक्षाचे असू शकतात. मात्र, भाजपचे नाहीत, असे केणेकर यांनी सांगितले.