महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये दुप्पट ऑक्सिजन साठा उपलब्ध; नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज - औरंगाबादमध्ये दुप्पट ऑक्सिजन साठा उपलब्ध

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ६३ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. सध्या ११० मेट्रिक टन म्हणजे ( 110 Metric Tons of Oxygen Available ) जवळपास दुप्पट ऑक्सिजनाची उपलब्धता असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद कलेश्वर ( Milind Kaleshwar Assistant Commissioner, Food and Drug Administration ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 6, 2021, 8:08 PM IST

औरंंगाबाद -कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला ( Short of Oxygen ) होता. मात्र कोरोनाची तिसरी लाट व ओमायक्रॉन ( New Omecron Variant ) या घातक विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ६३ मेट्रिकटन ऑक्सिजनची मागणी होती. सध्या ११० मेट्रिक टन म्हणजे ( 110 Metric Tons of Oxygen Available ) जवळपास दुप्पट ऑक्सिजनाची उपलब्धता असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद कलेश्वर ( Milind Kaleshwar Assistant Commissioner, Food and Drug Administration ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.


कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना बाधित गंभीर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती.परिणामी रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली होती. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. यामुळे काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय देखील झाली होती. ओमायक्रॉन या घातक विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे. आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ऑक्सिजनची कमतरता भासणारा नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद कलेश्वर यांनी दिली आहे.

  • आकडेवारी

ऑक्सिजन साठवणूक क्षमता - १३५ मेट्रिक टन

सध्या उपलब्ध ऑक्सिजन - ११० मेट्रिक टन

ऑक्सिजनची सध्याची गरज - ६-७ मेट्रिक टन

हवेतून ऑक्सिजन निर्मिती क्षमता - २० मेट्रिक टन

हेही वाचा -Rajesh Tope On Genome Sequence Lab : राज्यात आणखी दोन जिनोम सिक्वेन्ससिंग लॅब सुरू करणार - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details