औरंगाबाद - हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने ( Karnataka High Court on Hijab ) मोठा निर्णय दिला आहे. हिजाब हा मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्य असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आपला हा निर्णय ( Hijab Row Verdict ) दिला आहे. हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिजाब बंदीमुळे मुस्लीम मुली शिक्षणापासून दूर जातील असे मत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.
'सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्याला समर्थन' -
हिजाब बाबत उच्च न्यायाल्याने दिलेला निर्णय निराशाजनक आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असेलच असे नाही. त्यामुळे जर कोणी सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.