औरंगाबाद -या आधी पण लाऊड स्पीकरवर ( Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad ) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally news ) यांनी जाहीर सभेत केले.
हेही वाचा -Raj Thackeray : सुप्रिया सुळेंचा दाखल देत राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार म्हणजे'..
हा धार्मिक नाही सामाजिक प्रश्न -आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally ) यांनी सांगत, उत्तर प्रदेशात जर भोंगे काढले तर महाराष्ट्रात का नाही. सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.