महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक : भरधाव दुचाकी चालवणे बेतले अल्पवयीन मुलाच्या जीवावर - अपघात

शाळकरी मित्रांनी योग दिनानिमित्त गोगाबाबा टेकडीवर जाण्याचा बेत आखला. मात्र दुचाकीने भरधाव जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात उर्वेश सुभाष जुमडे याला आपला जीव गमवावा लागला.

अपघातग्रस्त गाडी

By

Published : Jun 21, 2019, 2:43 PM IST

औरंगाबाद- ट्रिपलसीट भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला अपघातात झाला. या अपघातात 15 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास बाबा पेट्रोल पंपाजवळ घडली. उर्वेश सुभाष जुमडे ( वय-15 रा. राजनगर, मुकुंदवाडी ) असे मृत मुलाचे नाव आहे.

घटनास्थळ


मृत उर्वेश हा संत मीरा विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिकत होता. आज जागतिक योग दिवस असल्याने शाळेतील सात मित्रांनी विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी आणि लेणी परिसरात फेरफटका मारण्याचा बेत आखला होता. उर्वेश आणि त्याच्या सात मित्रांनी सकाळी तीन दुचाकीवरून जाण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे आज सकाळी उर्वेशने त्याच्या दुचाकीवर दोन मित्रांना बसविले होते, तर इतर चार मित्र दोन दुचाकीवरून निघाले. ही सर्व मुले आज सकाळी साडेसात वाजता घरातून निघाली होती. दोन्ही मित्रांची दुचाकी पुढे जात असल्याने उर्वेशने दुचाकीची गती वाढविली.


विद्यापीठाकडे जात असताना बाबापेट्रोल पंपाजवळ येताच समोर बसने ब्रेक मारला, त्यापाठोपाठ समोरील मित्राने दुचाकींचा ब्रेक लावला. मात्र भरधाव वेगात असलेल्या उर्वेशला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे त्याची दुचाकी मित्राच्या दुचाकीला जाऊन धडकली. या अपघातात तो सुमारे 20 फूट दूरवर जाऊन पडला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या दुचाकीवर बसलेले दोन्ही मित्र किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details