औरंगाबाद - "मी आणि जलील साहेबांनी उद्या पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन कुराण वाचणार असं म्हटलं, तर तुम्ही काय म्हणाल...? रॅपिड अॅक्शन फोर्स लावाल, पोलिसांची ताकद लावून, आमच्यावर गोळीबार केला जाईल... बरोबर की नाही? मग आमचं असं वर्तन बरोबर आहे का? अशी टिका एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी ( AIMIM CHIEF ASADUDDIN OWASI ) यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. ते शनिवारी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी (Imtiyaz Jaleel ) एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi) शनिवारी शहरात आले होते.
राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करणे सोपे नाही
खासदार नवनीत राणा ( Navneet Kaur Rana )आणि आमदार रवी राणांवर "राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि जेलमध्ये टाकलं, असं तर होत नाही ना. पण याप्रकरणात सुप्रीम कोर्टाने लक्ष घातलंय. लवकरच याप्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टातही होणार आहे. ज्यांनी राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर, ना राणांवर माझं प्रेम आहे. मला एकच म्हणायचंय, दुसऱ्याच्या घरासमोर आपण का जाताय?" राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध करणे सोप नाही, माझ्यावर पण काही वर्षांपूर्वी असाच गुन्हा दाखल केला पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही.