महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Akbaruddin Owaisi : 'श्वान भुंकतोय भुंकू द्या, उत्तर देऊ नका'; अकबरुद्दीन ओवेसींची जीभ घसरली, म्हणाले...

'श्वान भुकतोय भुंकू द्या, त्यांच्या जाळ्यात अडकू नाका, शांत राहा, जो बोलतोय त्याला बोलू द्या, आपण हसत पुढे जायचे, श्वांनाचे काम भुंकने आहे, वाघाचे काम शांतीत जाणे आहे.' अशी टिका एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi ) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

Akbaruddin Owaisi
अकबरुद्दीन ओवेसी

By

Published : May 13, 2022, 7:21 AM IST

औरंगाबाद - 'श्वान भुकतोय भुंकू द्या, त्यांच्या जाळ्यात अडकू नाका, शांत राहा, जो बोलतोय त्याला बोलू द्या, आपण हसत पुढे जायचे, श्वांनाचे काम भुंकने आहे, वाघाचे काम शांतीत जाणे आहे.' अशी टिका एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi ) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल - 'मी कुणाला उत्तर द्यायला आलो नाही, तुमची लायकी नाही की तुम्हाला उत्तर देऊ माझा तरी एक खासदार आहे. तू तर बेघर आहे, तुला घरातून काढलेले आहे, लवकरच मोठी सभा घेऊन चांगले उत्तर देऊ. आज देशात विष पेरल्या जातेय, हिजाब बद्दल बोलताय मात्र आम्ही प्रेमाने उत्तर देऊ. जागा, वेळ मी ठरवेल आणि तुला उत्तर देईल. आता काय बोलायचं ते बोलू द्या तुम्ही घाबरू नका, आपल्याला घाबरायची गरज नाही.' अशी वेळ कधी आली तर ओवेसी पहिला असेल जो कुराणसाठी मरेल. इस्लाम काही केल्या संपणार नाही, तुला वाटत आम्ही घाबरवणार, तर आम्ही घाबरणार नाही हे औरंगाबाद आहे लक्षात ठेवा. तुम्ही कुणाला उत्तर देऊ नका, कायदा हातात घेऊ नका, उत्तर मी देईल चिंता करू नका, घाबरू नका. हा देश जितका त्याचा तितकाच माझा पण आहे.' अशी टिका अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली.

मी इथे शाळा उघडायला आलोय, जे माझ्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार, जी लोक कोविड काळात बेड मिळले नाही म्हणून ऑक्सिजन मिळाले नाही, मृत्यू झाला त्या सगळ्यांबाबत मी दुवा करतो. या देशात सगळ्यात मागासलेले कुणी असेल तर ते मुसलमान आहे. मी आभार मानतो ज्यांनी इम्तियाज जलील याना संसदेत पाठवले. ही शाळा आम्ही उडतोय हे आमचे योगदान आहे या देशासाठी. मी जर मुसलमान बाबत बोललो तर लोकांना वाईट वाटते, पण हो मी मुसलमान बाबत बोलतो बोलनार आणि बोलत राहणार. मी गरिबांसाठी बोलतो, भांडतो अनेकांना याचेही वाईट वाटते. देश सगळ्यांचा आहे कुना एकाचा नाही. अस मत अकबरुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

शाळा सर्वांसाठी असेल -या शाळेच्या माध्यमातून सगळे पुढं जातील आणि हा देश सुपर पॉवर बनेल. तुमचा मन आमच्यासाठी खराब आहे, मात्र आमचे मन तुमच्यासाठी नेहमी मोठे आहे. ही शाळा हिंदू असो वा अजून कुणी आमचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहे. कुणा एकाकडून देश मोठा होणार नाही असे वाटत असेल तर हा मूर्खपणा आहे. आमच्या मनात सगळ्यासाठी जागा आहे. 2020 च्या सर्वे नुसार 5.5 टक्के मुस्लिम उच्च शिक्षण घेतात. देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उर्दू शाळा महाराष्ट्रात आहेत मात्र त्यांची परिस्थिती फारच खराब आहे. मुस्लिम शिक्षणात मागे आहे. त्याची आकडेवारी देताय.

औरंगाबादेत 2021-22 मध्ये 10 वीच्या 8 हजार मुस्लिम मुलांनी शाळा सोडली, परीक्षा नाही दिली, मला कधीच राजकारण करायचं नाही करत नाही. मी ही शाळा उघडली. मला कधी आमदार खासदार व्हायचं नव्हतं. बस मेल्यावर अल्लाह विचारेल तुला इतकं सगळं दिल तर तू समाजासाठी काय केलं तर मी सांगेल होय मी समाजासाठी काम केलं. मी कुणाला घाबरत नाही. मी फक्त अल्लाह ला घाबरतो. माझ्यावर हमला होण्याआधी मी 2 शाळा उघडल्या आहे, मी आज जिवंत आहे तर त्या शाळेतील मुलांच्या दुवा वर. आमच्या सध्या हैदराबाद मध्ये 11 शाळा आहेत. माझी नियत चांगली आहे, खिशात पैसे नाही, मात्र ही शाळा ही बनेल विश्वास ठेवा, अल्लाह मदत करेल. मी घर नंतर बनवलं आमदार झाल्यावर, 4 वर्ष पैसे वाचवले आमदार पगाराचे आणि त्यातून पाहिली शाळा काढली. मीडिया म्हणेल ओवेसी भडकावू भाषण देतो, त्यासाठी हे वाट पाहताय. तुमचे कॅमेरे माझ्या शाळेत घेऊन या, आणि बघा दाखवा माझी शाळा, मी त्यांचा वारसदार आहे त्यांनी या देशाला ताजमहाल दिला. तुम्हाला वाटत असेल पत्रकारांनो की तुमची मुलं कॅमेरा पकडणार, पण मी म्हणतो तुमची मुलं माझ्या शाळेत येऊ द्या ते ही डॉक्टर होतील पत्रकार नाही, माझी शाळा जगाला लाजवणारी असेल असा विश्वास अकबरुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -Akbaruddin Owaisi Visit to Aurangzeb Grave : आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता

हेही वाचा -Akbaruddin Owaisi Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी; चंद्रकांत खैरेंची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details