औरंगाबाद (पैठण)- जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून गुरुवारी सकाळी 89 हजार क्यूसेस वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातील पाणीसाठा 98 टक्के -
नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणातून बुधवार सकाळपासून पाणी सोडण्यात आले. सुरुवातीला 4 नंतर 8 तर आता एकूण 18 दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरच्या बाजूने येणारी पाण्याची आवक प्रमाणे पाण्या विसर्ग सुरू असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात एकूण 98 टक्के इतका जलसाठा असून 18 दरवाज्यांमधून 89604 क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे.