'दुकानात वाईन विक्री करणे म्हणजे लहान मुलांच्या हाती दारू देणे' - इम्तीयाज जलील - एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील
वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकर्यांच्या हितासाठी घेतला असा राज्य सरकारचा दावा आहे. तसे नसल्यास नुसतं शेतकऱ्यांकडे अन्नधान्य नाही, तर दूध देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यावर एखादा प्रक्रिया करणारा उद्योग किंवा त्यापासून शेतकऱ्यांना फायदा होईल हे बघितले गेले नसल्याचा आरोप जलील यांनी केला.
imtiyaz jalil
औरंगाबाद - किराणा दुकानात वाईन विक्रीबाबत (Selling Wine in Supermarket) सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आता राजकीय टीका सुरू झाली आहे. त्यात कोणत्याही किराणा दुकानात वाईन विक्री सुरू केल्यास ते दुकान आम्ही फोडू असा इशारा एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
'किराणा दुकानात वाईन विक्री करणे म्हणजे लहान मुलांच्या हाती दारू देण्यासारखे आहे. सध्या सरकार पैशासाठी राज्याची संस्कृती नष्ट करून, दुसरी वेगळी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर राज्यातील कोणत्या मंत्र्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात येऊन एखाद्या वाईन शॉपचे उद्घाटन करून दाखवा. आम्ही ते होऊ देणार नाही. जिल्ह्यातील महिला, मुलं, सुशिक्षित नागरिक माझ्या बाजूला राहतील', असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला.
शेतकऱ्यांना गांजा शेती करण्याची परवानगी द्या
'वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकर्यांच्या हितासाठी घेतला असा राज्य सरकारचा दावा आहे. तसे नसल्यास नुसतं शेतकऱ्यांकडे अन्नधान्य नाही, तर दूध देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यावर एखादा प्रक्रिया करणारा उद्योग किंवा त्यापासून शेतकऱ्यांना फायदा होईल अस का बघितले गेले नसल्याचा' आरोप जलील यांनी केला. इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या फायदा जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकऱ्यांना यापुढचे चरस आणि गांजाची शेती करू द्या अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
Last Updated : Jan 31, 2022, 8:01 PM IST