महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Imtiaz Jaleel on Raj Thackeray : सभेत नियमांचे उल्लंघन, राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करा - खासदार इम्तियाज जलील - imtiaz Jaleel news aurangabad

राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Raj Thackeray ) यांनी केली आहे. जलील यांनी शेरोशायरी अंदाजात राज ठाकरे ( Imtiaz Jaleel news Aurangabad ) यांच्यावर टिका केली.

imtiaz Jaleel on Raj Thackeray
इम्तियाज जलील प्रतिक्रिया

By

Published : May 2, 2022, 10:17 AM IST

Updated : May 2, 2022, 1:30 PM IST

औरंगाबाद - राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Raj Thackeray ) यांनी केली आहे. जलील यांनी शेरोशायरी अंदाजात राज ठाकरे ( Imtiaz Jaleel news Aurangabad ) यांच्यावर टिका केली.

प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील

हेही वाचा -Raj Thackeray Aurangabad Sabha : सभेदरम्यान अजान सुरु झाल्याने राज ठाकरे संतापले, म्हणाले....

शायरी अंदाजात टिका -सियासात की दुकानो मे रोशनी के लिय मुल्क मेरा जलता, अशा आणि सियासत नफरतो के जखमो को भरणे नही देती, जब भी भरणे आता है जख्म वहा मख्खी बैठ जाती है, अशा अंदाजात त्यांनी टिका केली. तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक तेढ वाढवणे सुरू आहे. भोंगे काढण्याची मुदत एक दिवसाने वाढली. म्हणजे ते म्हणतात कार्यकर्त्यांनो तुम्ही करा आणि मी अयोध्येला जातो, म्हणजे केसेस कार्यकर्त्यांवर. ते मरणार हे फिरणार, अशी टीका जलील यांनी केली.

भारतीय जनता पार्टी तुम्हाला रिमोट कंट्रोलद्वारे चालवत आहे. भाजप सरकारने त्यांच्या काळात काहीच केले नाही. खिलजीची आठवण आता कशाला. जी चूक झाली ते झाली, आज का काढायची. कोर्टाचे आदेश आम्ही पाळू कारण तो कोर्टाचा आदेश आहे. तुम्ही डुप्लिकेट माणूस आहात, आम्ही नाही. सभा करून निर्णय होत असेल तर यापेक्षा दुप्पट सभा आम्ही घेऊ. मी ही बोलू शकतो, जीभ आम्हालाही आहे, आता सरकारने निर्णय घ्यावा, असा इशारा जलील यांनी दिला.

भोंग्यांबाबत माझा विरोध नाही. मुस्लीम समाज विरोध करणार नाही. मात्र, नियमाने व्हायला हवे. नियम पाळायचे नसेल तर पोलीस स्टेशन, कोर्ट बंद करून टाका. भोंगे काढायला आमचा विरोध नाही, आम्ही कधीही विरोध केला नाही, मात्र हा दंगल करायचा डाव आहे. या सभेत नियमांचे उल्लंघण झाले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले, तर मी कोर्टात जाणार, असा इशारा जलील यांनी दिला.

हा देश आमचा आहे आणि आम्ही सगळे सोबत राहू, सुप्रीम कोर्टाने भोंगे काढायला सांगितले नाही. कोर्ट म्हणाले डेसिबलचा नियम पाळा. आता एकदा होऊन जाऊ द्या याचा अर्थ काय? बाबरी पुन्हा का आली? बाबरी मुस्लीम समाजाने स्वीकारली ना, मग पुन्हा मुद्दा कशाला? मुस्लीम विषय काढून यांना राजकारण करायचे आहे. यातून ते मोठे व्हायचे स्वप्न पाहत आहे, असे खासदार जलील यांनी सांगितले.

हेही वाचा -Raj Thackeray on loudspeaker : भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नही तर सामाजिक - राज ठाकरे

Last Updated : May 2, 2022, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details