औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, रोज किमान 100 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडत असल्याची चर्चा आहे. शहराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार विनिमय करण्यासाठी शहरातील सर्व पक्षांचे खासदार, आमदार एकत्र आले आहेत. सुभेदारी विश्रामगृहात महत्वाची बैठक घेतली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता औरंगाबादेत सर्व आमदार, खासदारांची महत्वाची बैठक - aurangabad corona latest news
बैठकीत खासदार इम्तियाज जलील, भाजप खासदार भागवत कराड, आमदार डॉ अंबादास दानवे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, सतीश चव्हाण यांनी उपस्थिती लावली.
औरंगाबादेत सर्व आमदार, खासदारांची महत्वाची बैठक
सुभेदारी विश्रामगृहात बोलावलेल्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील, भाजप खासदार भागवत कराड, आमदार डॉ. अंबादास दानवे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, सतीश चव्हाण यांनी उपस्थिती लावली. शहराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विचार विनिमय केला जाणार आहे.