महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीड रेडिओ बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय - मुंबई हायकोर्ट

२०१२ मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या रेडिओ बॉम्बच्या स्फोटात एसटीचा कंडक्टर आणि त्याच्या घरातील तिघे जखमी झाले होते. मासे मारण्यासाठी आणलेल्या डिटोनेटरचा यात वापर करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी आबा गिरी याला अंबेजोगाई सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

बीड रेडिओ बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
बीड रेडिओ बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

By

Published : Jul 21, 2021, 12:22 PM IST

Updated : Jul 21, 2021, 12:32 PM IST

औरंगाबाद : बीड येथे 2012 मध्ये झालेल्या रेडिओ बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी आबा गिरी याला अंबेजोगाई सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

रेडिओ स्फोटात बस वाहकाचे कुटुंब जखमी
२०१२ मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या रेडिओ बॉम्बच्या स्फोटात एसटीचा कंडक्टर आणि त्याच्या घरातील तिघे जखमी झाले होते. कंडक्टर ओम निंबाळकर यांना एसटी बसमध्ये एक बेवारस पार्सल सापडले होते. हे पार्सल घेऊन ते घरी गेल्यानंतर त्यात एक रेडिओ त्यांना आढळला. या रेडिओत सेल टाकल्यानंतर त्याचा लगेच स्फोट झाला. यात कंडक्टर निंबाळकर, त्यांची आई, मुलगा आणि पत्नी जखमी झाले होती. या घटनेच्या तपासादरम्यान बीडमधील एका व्यक्तीने शेतीच्या भांडणाच्या कारणावरून दुसऱ्याला अडकविण्यासाठी त्याच्या नावे हे पार्सल पाठविल्याचे उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मासे मारण्यासाठी आणलेल्या डिटोनेटरचा यात वापर करण्यात आला होता.

बीड रेडिओ बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

आबा गिरीने बॉम्ब तयार केल्याचा आरोप
या प्रकरणाच्या पोलीस तपासातील माहितीनुसार, रेडिओ ठेवलेल्या आबा गिरी याचे त्यांच्या गावातील गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण होते. त्यामुळे आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव यांच्याकडून जिलेटीन कांड्या घेऊन रेडिओ स्फोटाचा कट रचला. मात्र हा रेडिओ तो बसमध्येच विसरला आणि पार्सल वाहकाने घेतले आणि पुढे स्फोट झाल्याने वाहकाचे कुटुंब जखमी झाले.
अंबेजोगाई कोर्टाने दिली होती जन्मठेप
पोलिसांनी तपास पूर्ण करून 11 जानेवारी 2014 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले. अंबेजोगाई येथे अपर सत्र न्यायाधीश आर ए गायकवाड यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली असता सबळ पुरावा ग्राह्य धरून आबा गिरी यांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली. तर दत्ता जाधव विरोधात सबळ पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
आबा गिरी विरोधात पुरावा नसल्याने सुटका
या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने पुराव्याअभावी आरोपी आबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली आहे. आबा गिरी यांना रेडिओ ठेवताना कोणीही पाहिलेले नाही, त्याच बरोबर त्यांचे शिक्षण पाहता रेडिओ मध्ये स्फोट होईल असे सर्किट ते तयार करू शकतील इतके त्यांचे ज्ञान नाही असे सांगत खंडपीठाने आबा गिरी यांची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा -Pegasus Snooping : इस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Last Updated : Jul 21, 2021, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details