औरंगाबाद -मुख्याध्यापक महिलेसह शिक्षकाला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी प्राईम स्टार इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे.
औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण - Headmaster
मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण
शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापक संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. यानंतर आता मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.