औरंगाबाद - औरंगपुरा येथील औषध भवन परिसरामध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या दुकानांसह घरात घुसले आहे. दरम्यान संतप्त झालेल्या माजी नगरसेविकेच्या दिराने माजी खासदार व महापौरांना चांगलेच सुनावले.
गडी काय ऐकायला तयार नाही, महापौरांसह माजी खासदारांवरही भडकला 'माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न'
शहरात जोरदार पाऊस झाल्याने, अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. दरम्यान, औरंगपूरा भागातील औषध भवन परिसरामध्ये नाल्याचे काम रखडले असल्यामुळे पाणी साचले होते. ते संपूर्ण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या माजी नगरसेविकेचा दिर अजय चावरिया यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडी काय ऐकायला तयार नाही. तुम्ही इकडे राहून पहा मग तुम्हाला कळेल असही चावरिया यांनी यावेळी सुनावल आहे.
काम होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
औषध भवन परिसरामध्ये असलेल्या नाल्यात कचरा साचला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या नाल्याचे काम थांबलेले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी तर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्तादेखील राहिलेला नाही. यासंदर्भात मनपा प्रशासन तसेच नेत्यांना वारंवार विनवण्या करूनही या पुलाचे काम होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज नेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी खैरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तत्काळ या कामात लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या आहेत.