औरंगाबाद - भाजपच्या नुपूर शर्मा यांना फाशी द्यायला हवी, अशी मागणी एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील ( MIM State President Imtiaz Jalil ) यांनी केली आहे. पक्षातर्फे त्यांच्यावर फक्त करवाई करणे योग्य नाही, अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे खासदार जलील म्हणाले.
केंद्राने कायदा करावा -कोणत्याही जाती धर्माबाबत आक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी केंद्राने वेगळा कायदा ( Center separate law ) केला पाहिजे. असे वक्तव्य केल्यावर फक्त पक्षातर्फे कारवाई कारवाई केली म्हणजे झाल का?. नुपूर शर्मा यांना इतक सहज सोडून देणे योग्य नाही. या कारवाईवर जगात कोणीही संतुष्ट नाही. कोणत्याही जाती-धर्माबाबत वक्तव्य करणाऱ्यांसाठी नवा कायदा करावा असे जलील यांनी सांगितले.