महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुलाब चक्रीवादळ : कुठे घरात शिरले पाणी तर कुठे वीजपुरवठा खंडित

रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महानगरपालिका परिसरात असलेली तीन ते चार झाडे कोसळली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका रिक्षाचा चुराडा झाला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मैदानात असलेले झाडेही उन्मळून पडली.

Gulab cyclone
झाडांमुळे नुकसान तसेच वीजपुरवठा खंडित

By

Published : Sep 28, 2021, 8:28 PM IST

औरंगाबाद - गुलाब चक्रीवादळाने शहरात रात्री बारा वाजल्यापासून पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनाचे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.शहरात झालेल्या अनेक भागातील वीज खंडित झाली आहे.

झाडांमुळे नुकसान तसेच वीजपुरवठा खंडित

रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महानगरपालिका परिसरात असलेली तीन ते चार झाडे कोसळली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका रिक्षाचा चुराडा झाला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मैदानात असलेले झाडेही उन्मळून पडली. अनेक शासकीय वाहने तसेच खाजगी वाहने झाडांखाली दबली गेली. शहरातील अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

झाडांमुळे नुकसान तसेच वीजपुरवठा खंडित

या भागात शिरले पाणी
जय भवानीनगर, रेल्वेस्टेशन, कैलासनगर, गोमटेश मार्केट, पुंडलिक नगर, पारनदरीबा रोडवरील गोवर्धन कॉम्प्लेक्स, सिंगापूर कॉम्प्लेक्स, जाधववाडी, चीकलठणा, सातारा परिसर, हर्सूल, जटवाडा, मयूर पार्क, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन, टाऊन हॉल, बेगमपुरा, भवासिंगपुरा

हेही वाचा -Jalgaon Flood : जळगावात पुन्हा उद्भवली पूरस्थिती; रात्रभर सर्वदूर मुसळधार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details