महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यात टीका नव्हती... सुभाष देसाई यांची सावध प्रतिक्रिया

मागच्या तीस वर्षांपासून शिवसेना स्वबळावर सत्तेत येऊ असं म्हणते. या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षात स्वप्न असतं, आपण स्वबळावर सत्तेत यावं. शरद पवार अनुभवी नेते आहेत. यात काहीही टीका वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

guardian minister of aurangabad
शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यात टीका नव्हती... सुभाष देसाई यांची सावध प्रतिक्रिया

By

Published : Oct 30, 2020, 4:50 AM IST

औरंगाबाद - मागच्या तीस वर्षांपासून शिवसेना स्वबळावर सत्तेत येऊ असं म्हणते. या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षात स्वप्न असतं, आपण स्वबळावर सत्तेत यावं. शरद पवार अनुभवी नेते आहेत. यात काहीही टीका वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यात टीका नव्हती... सुभाष देसाई यांची सावध प्रतिक्रिया
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत पोलिसांच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राची ओळख करून देणारा प्रकल्प म्हणून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची ओळख असून तो मार्च पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 165 किलोमीटरचा रस्ता असून बहुतांश काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

पाणीपुरवठा योजना

गावा गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून औरंगाबाद जिल्ह्यातील 304 गाव टंचाई मुक्त करण्याचे नियोजन आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी संगितल्याप्रमाणे औरंगाबाद शहरासाठी 150 कोटींच्या रस्त्यांची कामं पूर्ण होतील. त्यातील 23 महत्त्वाच्या रस्त्यांचे काम लवकर सुरू होईल, असे देसाई म्हणाले. शहरातील गुंठेवरीचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेत आहोत. तो प्रश्न देखील मार्गी लागेल.

कांदा साठवणुकीसंदर्भात केंद्राने निर्णय घेण्याची विनंती

कांद्याबाबत राज्य सरकार जमेल ते सगळं करतेय, आमची केंद्र सरकारला कांद्याच्या मुद्यावर विनंती केली आहे. आयात-निर्यातीबाबत शेतकरी हिताचे निर्णय घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारला केला आहे, असे देसाई म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भेटीबाबत राज्यपालांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. यावर राज्यपालांचे काम लोकांना भेटण्याचे असते. यातून त्यांचे ज्ञान वाढते, असा टोला सुभाष देसाई यांनी राज्यपालांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details