औरंगाबाद - समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले.
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात गुरूची परंपरा आहे ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो, समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरूचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.