औरंगाबाद - 'काश्मीर फाईल्स'वरून प्रचंड राजकीय वातावरण पेटलं आहे. त्याच वास्तव आज पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मिरच्या लोकांना अश्वासन दिली होती. पण, आज सुरक्षा पुरवण्यात कमी पडत आहे. गृहमंत्री यांनी याच उत्तर द्यावे. काश्मिर महिला पंडित यांना शस्त्र दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिर पंडित सोबत असल्याचं म्हटलं आहे, अस मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत ( Give Weapons Kashmiri Pandits Woman Say Neelam Gorhe ) होत्या.
'पाठीत खंजीर खुपसला म्हणाणाऱ्यांनी...' - नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस तयार असले तरी आता एकत्र येणार नाही. काही लोक आमदारांना गन पाँईंन्टवर ठेवतात. तुम्ही खंजीर देता आणि म्हणता खंजारी खुपसला. ईडीची कारवाई करुन महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांवर कारावाई केली जाऊ शकते. कोणत्याही आमदारावर नजर नाही. दोन दिवस आमदार सोबत राहिल्यास काय अडचण आहे, असेही गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
'नववारी सोड्या नेसण्याची गरज नाही' -शिवसेना आणि संभाजीनगर याचं वेगळं नातं आहे. नामकरण महत्वाचं आहेच, मुख्यमंत्री यांच्या भाषणात सर्व स्पष्ट होईल. सर्व राजकीय आव्हानाला सामोरं जाण्याची आमची तयारी होती. शिवसेना आमदार फुटणार नाही, आम्हाला निवडणुकीत यश मिळेल. आम्हाला मानस जमा करण्यासाठी नववारी साड्या नेसण्याची गरज नाही, असेही गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
नीलम गोऱ्हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'पंकजा मुंडेंच काम चांगल आहे' - पाण्याच्या मोर्चा फडणवीस यांनी काढला, मुख्यमंत्री असताना कंत्राटदारावर का त्यांनी गुन्हे दाखल केले नाही?. संभाजीनगरबाबत कराड यांनी बैठक घेऊन मोदींकडून नामकरण करून आणावं, उगाच सरकारला दोषी ठरवू नका. महापालिकेला सुध्दा थोडे भ्रष्टाचाराचे कीड लागलं आहे, कारण भाजपा सुद्धा सत्तेत आहे. आम्हाला प्रस्ताव मिळाला नाही म्हणणाऱ्या लोकांना सवयच आहे. झोपलेल्या लोकांना उठवता येत नाही. मधल्या काळात ज्यांना संधी मिळाल्या त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम चांगलं आहे, असे सुद्ध नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -Sanjay Raut On Kashmiri Pandit Attack : 'काश्मिरी पंडितांवर सातत्याने होणारे हल्ले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अपयश'