महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रेमासाठी काहीही! प्रियकराला भेटण्यासाठी तिने केला 'असा' प्लॅन; नागरिकांच्या संशयाने फुटले बिंग - औरंगाबाद ताज्या बातम्या

एका मुलीने सर्व्हे करण्याच्या बहाण्याने दोन मैत्रिसोबत घेऊन प्रियकराची सोसायटी गाठली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोसायटीत अनोळखी तीन मुली परवानगीविनाच फिरत असल्याने नागरिकांनी त्यांना पकडले. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले.

aurangabad
aurangabad

By

Published : Sep 28, 2021, 11:50 AM IST

Updated : Sep 28, 2021, 1:05 PM IST

औरंगाबाद -दोन वर्षांपासून प्रियकराला त्याच्या घरातील लोक भेटू देत नसल्याने एका मुलीने सर्व्हे करण्याच्या बहाण्याने दोन मैत्रिसोबत घेऊन प्रियकराची सोसायटी गाठली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोसायटीत अनोळखी तीन मुली परवानगीविनाच फिरत असल्याने नागरिकांनी त्यांना पकडले. यावेळी नागरिकांनी दामिनी पथकाला बोलवल्याने प्रियसीचे बिंब फुटले.

प्रतिक्रिया

दोन मैत्रीणीला घेऊन रचना प्लॅन -

एका फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीचे एएस क्लब परिसरात राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, याची माहिती मुलाच्या घरच्यांना लागली. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. तसेच त्यांना दोन वर्षांपासून घराबाहेरही जाऊ दिले नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून दोघांची भेट होऊ शकत नव्हती. दरम्यान, नागपूर येथून एक मुलगी शिकण्यासाठी औरंगबाद येथे आली असता. तिची या मुली्शी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. सोबत अजून एका मैत्रीणीला घेऊन तिघींनी मुलाच्या सोसायटीमध्ये जाऊन टेरेसवरून मुलाचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांना संशय आल्याने त्यांनी या मुलींकडे विचारणा केली, तसेच या माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या दामिनी पथकाने घटनास्थळी दाखल होत मुलींनी ताब्यात घेतले. दरम्यान, महिला पोलिसांनी मुलींना विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारणा केली असता, तिचे सर्व हकिकत सांगतील. त्यानंतर नागरिकांचीही कोणतीच तक्रार नसल्याने पोलिसांनी तिन्ही मुलींना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा - प्रचारादरम्यान शिवसेनाप्रणित आमदाराची जीभ घसरली; काँग्रेस, राष्ट्रवादीवर खालच्या भाषेत टीका

Last Updated : Sep 28, 2021, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details