महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार; पीडितेचा जीवन–मृत्युशी संघर्ष - लैंगिक अत्याचार

मूळ जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणी मुंबई येथे भावाकडे राहायला गेली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी 6 च्या सुमारास घरी आली तेव्हा तिची परिस्थिती खूपच खराब झाली होती.

जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईत सामूहिक बलात्कार पीडितेचा जीवन – मृत्यूचा संघर्ष

By

Published : Aug 1, 2019, 2:00 PM IST

औरंगाबाद - मुंबई शहरात आपल्या भावाकडे राहायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली आहे. घाटी रुग्णालयात तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष चालू आहे. या प्रकारांची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने घाटी रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक ती प्राथमिक माहिती मिळवून पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती जबाब देऊ शकत नाही. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईत सामूहिक बलात्कार पीडितेचा जीवन – मृत्यूचा संघर्ष

मूळ जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणी मुंबई येथे भावाकडे राहायला गेली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी 6 च्या सुमारास घरी आली तेव्हा तिची परिस्थिती खूपच खराब झाली होती. घरी येताच ती काही न सांगता झोपी गेली. दोन दिवस ती झोपेतून उठत नसल्याने पीडितेच्या भावाने ही बाब आई-वडिलांना सांगून त्यांना मुंबई येथे बोलावून घेतले. आई-वडिलांना पीडितेला अर्धाअंगवायू सदृश्य आजार झाला असावा, असे वाटल्याने त्यांनी पिडितेला गावी आणले आणि डॉक्टरांना दाखवले. मात्र, तसा प्रकार नसल्याने त्यांनी अधिक उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर एमएलसी नोंद करण्यात आली.

25 जुलै 2019 पासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी लेखी विनंती केली. मात्र, पीडिता जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस बेगमपुरा पोलिसांनी पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने अखेर पीडितेच्या वडिलांचा जबाब घेऊन अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 376, 34 अन्वये बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल केलला गुन्हा पुढील तपासासाठी बेगमपुरा पोलिसांनी, चुनाभट्टी पोलीस ठाणे मुंबई यांच्याकडे वर्ग केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details