महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुझ्यासारखी महिला शोधून दे म्हणत मद्यपिचा राडा, नागरिकांकडून मिळाला चोप - Alcoholic

तुझ्या सारखी महिला शोधून दे, मी तुला दोन लाख रुपये देतो असे म्हणत भाजी विक्रेत्या महिलेची छेड काढणाऱ्या मद्यापिला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. यावेळी दामिनी पथकाने देखील त्याला ताब्यात घेऊन चांगलाच झोडपले.

महिलेचा विनयभंग केल्याबद्दल औरंगाबादमध्ये मद्यपिला दामिनी पथकाने घेतले ताब्यात
महिलेचा विनयभंग केल्याबद्दल औरंगाबादमध्ये मद्यपिला दामिनी पथकाने घेतले ताब्यात

By

Published : Sep 15, 2021, 10:40 AM IST

औरंगाबाद - तुझ्या सारखी महिला शोधून दे, मी तुला दोन लाख रुपये देतो असे म्हणत भाजी विक्रेत्या महिलेची छेड काढणाऱ्या मद्यापिला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. यावेळी दामिनी पथकाने देखील त्याला ताब्यात घेऊन चांगलाच झोडपले.

महिलेचा विनयभंग केल्याबद्दल औरंगाबादमध्ये मद्यपिला दामिनी पथकाने घेतले ताब्यात

संतापलेल्या महिलेने आरडाओरडा केला

गेल्या काही दिवसांपासून शहरात महिलांची छेड काढणे, महिलांशी गैरवर्तन करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा टीव्ही सेंटर भागातील कॅनॉट परिसरात एक भाजी विक्रेती महिला छेड कडल्याची घटना घडली आहे. ३२ वर्षीय महिला नियमितपने भाजी विक्री करत होती. यावेळी परिसरात राहणाऱ्या मद्यपी त्यांच्या जवळ आला. यावेळी तो भाजी विक्रेत्या महिलेला म्हणाला तुझ्या सारखी महिला मला शोधून दे, मी तुला दोन लाख रुपये देतो. दरम्यान, संतापलेल्या महिलेने आरडाओरड करत मद्यापीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी जमलेल्या नागरिकांना महिलेने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर नागरिकांनीही या माद्यापिला चांगलाच चोप दिला.

दामिनी पथकाने कानउघाडणी करत दिला समाज

घटनेची माहिती मिळताच दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे, नेहा वायभट या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, महलेने संपूर्ण प्रकार सांगितला. यावेळी मद्यपी हा महिलेची माफी मागत होता. या प्रकरणी महिला तक्रार देण्याची विनंती दामिनी पथकाने केली. आरोपी हा परिसरातीलच असल्याने, एवढ्या वेळेस माफ करते म्हणत त्याविरोधात तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान दामिनी पथकाने माद्यपिला ताब्यात घेऊन समज दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details