औरंगाबाद -यावर्षी सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा राहिला असला तरी आणखीन काही तरतुदी अपेक्षित होत्या असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. अर्थसंकल्पात दमणगंगा प्रकल्पासाठी तरतुदी करण्यात आल्या. हा प्रकल्प झाला तर मराठवाड्याला निश्चितच त्याचा फायदा होईल. मराठवाडा, नगर आणि नाशिकमधील पाणी प्रश्न देखील सुटणार आहे. पाण्यावरून नेहमी मराठवाडा, नगर आणि नाशिक यामध्ये वाद पाहायला मिळाले. मात्र या योजनेमुळे हे वाद थांबतील आणि सिंचन क्षेत्र वाढेल, असे मत जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
शेतकरी अनेक प्रकल्प राबवत असतात, मात्र ते परवडत नाहीत. त्यातीलच एक म्हणजे तेलबिया. तेलबियामध्ये शेतकरी स्वयंपूर्ण नाही, तेलाच्या वाढत्या किंमती पाहता तेलबिया तयार करणारे परवडणारे नाही. मात्र त्यात केंद्र सरकार मदत करणार असल्याने ही एक जमेची बाजू या अर्थसंकल्पात पाहायला मिळाली. तर झिरो बजेट शेती किंवा नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यासाठी महाविद्यालयात शिक्षण देणार असल्याचे, या अर्थसंकल्पात सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती बाबत काही घोषणा केल्या होत्या. त्याला अनुसरून हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर जमिनीचा कार्बन वाढला आहे आणि त्यासाठी देखील तरतूद केली जाणार आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल. त्याच बरोबर चांगला अन्न देखील नागरिकांना मिळणार आहे असे, जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. इंग्रजाच्या काळात शेतीची मोजमाप करण्यात आली होती. त्यानंतर आता मोजमाप करण्यासाठी ड्रोनचा वापर करायला परवानगी दिली आहे. तर ड्रोन आधारे औषध फवारणी करता येईल,, त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
'ग्रामीण भागात बँकांचे जाळे महत्वाचे'