औरंगाबाद -इंडियन नर्सिंग काँसिलच्या अभ्यासक्रमातील ( Indian Nursing Council course syllabus ) एक पाठ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हुंडा प्रथा कशी चांगली होती, त्याचा मुलींचे लग्न जुळण्यास कसा फायदा व्हायचा याबाबत माहिती देण्यात आली ( supports Dowry practice ) आहे. त्यामुळे नर्सिंग काँसिलला हुंडा प्रथा मान्य आहे का? असा प्रश्न औरंगाबादच्या समाजसेविका आणि वैद्यकीय अभ्यासक डॉ.रश्मी बोरीकर यांनी उपस्थित ( Dr. Rashmi Borikar attack on Indian Nursing Council ) केला आहे.
असा निर्माण झाला वाद -इंडियन नर्सिंग कौन्सिल तर्फे अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या एक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पाहून सर्वांना धक्का बसलाय. पण हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिल निश्चित केलेल्या, अभ्यासक्रमानुसार टी.के. इंद्राणी लिखित पुस्तकात हुंड्या बद्दल सर्व माहिती दिली आहे. हुंडा मिळाल्याने नवीन घर, फर्निचर, रेफ्रिजेटर सुसज्ज करता येते. मुलींना पालकांनी मालमत्तेतील वाटा दिला जातो. मोठा हुंडा देण्याची तयारी असल्यास कुरूप मुलींचेही विवाह लगेच जुळतात, हुंडापद्धती एक अप्रत्यक्ष फायदा मुलींच्या शिक्षणासाठी झाला, मुली जास्त शिकलेल्या असल्या म्हणजे होंडा कमी द्यावा लागतो असं या पुस्तकात नमूद केला आहे. त्यामुळे एकीकडे देशात न्यायालयाने हुंडा बंदी लागू केली असताना मेडिकल काँसिल हा अभ्यासक्रम घेत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अभ्यासकांनी केली व्यक्त नाराजी -या अभ्यासक्रमाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी रोष व्यक्त केला आहे. अशा पद्धतीने हुंडा प्रथेला प्राधान्य देणं हे चुकीच आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिल एक अशी शाखा आहे. ज्यामध्ये परिचारिकांना नागरिकांशी संपर्क साधणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, याबाबत शिक्षण दिलं जातं. मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीने हुंडा प्रथेला प्राधान्य देणं हे चुकीचा आहे. हुंडा प्रतिबंध कायबद्दल माहिती देणे, त्याच्या बद्दल जनजागृती करणे इतकेच नाही तर हा कायदा आपल्या देशात आहे आणि हुंडा देणे आणि घेणे हे चुकीचा आहे. याबद्दल नर्सिंग कन्सिल अभ्यास शिक्षण दिलं पाहिजे. कारण जर हुंडाप्रतिबंधक कायद्याबाबत परिचारिकांना माहिती असली, तर काही ठिकाणी पीडित महिलेकडून माहिती मिळवून पोलिसांना मदत होऊ शकते. मात्र तसं न करता हुंडा प्रथा किती चांगली आहे. हे सांगणे अतिशय चुकीचं असल्याचं मत समाजसेविका आणि वैद्यकीय अभ्यासक डॉ. रश्मी बोरीकर यांनी व्यक्त केलं. याबद्दल नर्सिंग कौन्सिल ला जाब विचारला गेला पाहिजे असे देखील डॉ. बोरीकर यांनी सांगितले.