औरंगाबाद - इतर मुलांशी बोलशील तर तुझीही कशीश करील, अशी धमकी मानलेल्या भावाने दिल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात समोर आली. या प्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तर कॉलेजमध्ये दामिनी पथकाला पाचारण करताच हा तरुण व्हॉट्सअॅपवर आत्महत्येची धमकी ( Suicide threat ) देत पसार झाला.
कशीशच्या हत्येने हादरले होते शहर -मे महिन्याच्या अखेरीस देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कशीश उर्फ सुखप्रितची एकतर्फी प्रेमातून युवकाने हत्या केली होती. अत्यंत निदर्यीपणाणे केलेल्या या हत्येप्रमाणेच जिवे मारण्याची धमकी वाळूज परिसरातील एका फार्मसी महाविद्यालयात शिकाणाऱ्या युवतीलाही ( collage girl studying in College of Pharmacy ) देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तक्रारदार युवतीची ओळख तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकाशी झाली होती. काही दिवसांनी या युवतीकडून त्याने राखीही बांधून घेतली. तथापि, त्यानंतर तो सातत्याने तक्रारदार युवतीवर हक्क गाजाविण्याचा प्रयत्न करू लागला. तिचे इतर मुलांशी बोलणे त्याला खटकू लागले. त्यावरून अनेकदा त्यांचे खटके उडाले. मात्र, युवती ऐकत नसल्याने तुझीही अवस्था कशीशसारखी करील, अशी धमकी त्याने त्या तरुणीला दिली. या प्रकाराने युवतीला मोठा धक्का बसला.