औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. भडकलगेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसगर लोटल्याचे पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त सकाळपासून शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले.
औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी
भडकलगेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसगर लोटल्याचे पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त सकाळपासून शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले.
मराठवाड्यातील युवकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीत जावे लागायचे. मात्र, हैदराबादला शिक्षण घेण्याची प्रत्येकाची कौटुंबीक परिस्थिती नव्हती. त्यामुळे, मराठवाड्यात उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याबरोबरच मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे, औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले. बाबासाहेबांच्या या कार्याने मराठवाड्याला नवीन शैक्षणिक जीवनदान मिळाले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला भीमसैनिक अभिवादन करून त्यांच्याप्रती आपली भावना व्यक्त करतात.