औरंगाबाद- राज्य सरकारने घोषणा करूनही वीजेची सवलत दिली नाही. एकत्रित बिल करून ग्राहकांना वाढीव युनिटचे बिल दिले आहे. मंत्र्यांना अभ्यास नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यामुळे राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे समोर आल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवित आहेत. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे. यासाठी आमच्या सरकारने कामे केली आहेत. मात्र, या राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मराठवाड्याचे प्रमुख शहर असलेल्या १६८० कोटी पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबादला दिले आहे. इतर शहरांनीही निधी दिला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहेत. मात्र, सरकारने कोणतीही मदत केली नाही. कापूस खरेदी केंद्रही सुरू केले नाही.
हेही वाचा-...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
वीज बिल माफ करण्याबाबतही सरकारने अचानक भूमिका बदलली आहे. त्यामुळे जनतेत रोष आहे. शिक्षकांना अनुदानाचा टप्पा उशीर दिला आहे. जवळपास सर्वच शिक्षकांचा दहा-बारा महिन्यांचे नुकसान झाले आहे. देशभरात मोदी सरकारवर जनतेने विश्वास दाखविला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.