महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचे 17 नवीन रुग्ण, एकूण संख्या 373 वर - कोरोनाबाधित रुग्ण

बुधवारी औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 17 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 373 वर पोहचली आहे. तसेच शहरातील अनेक भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.

Aurangabad General Hospital
औरंगाबाद सामान्य रुग्णालय

By

Published : May 7, 2020, 10:04 AM IST

औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. बुधवारी औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 17 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 373 वर पोहचली आहे. तसेच शहरातील अनेक भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.

गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात ; रेल्वे स्टेशन - 1, जयभीम नगर - 2, किलेअर्क - 2, पुंडलिक नगर - 5, हमालवाडी - 4, कटकट गेट - 3 या परिसरातील 17 नवीन रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांमध्ये 10 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा...MAHA CORONA : राज्यात आज 1233 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 16 हजार 758

औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. बुधवारी दिवसभरात 35 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या 356 झाली होती. दिलासा देणारी बाब म्हणजे बुधवारी तीन रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दररोज कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट समोर येत असल्याने प्रशासनासमोर चिंता वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाजारात गर्दी वाढू नये, यासाठी एक दिवसाआड बाजारपेठ उघडली जात असून दोन तास लॉक डाऊन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सम तारखेला अत्यावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details