औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 48 दिवसात शहरात हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी सकाळी 59 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या 1021 वर पोहोचली आहे.
धक्कादायक; औरंगाबादेत कोरोना रुग्णांनी ओलांडला हजारांचा टप्पा, रुग्णसंख्या 1021 वर - औरंगाबाद
शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी २० तारखेपर्यंत शंभरटक्के औरंगाबाद बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात सोमवारी सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर (1), हिमायत बाग, सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.
आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना स्थिती पाहता उपचार सुरू असलेले 668 असून आतापर्यंत 322 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजून काही अहवाल येणे बाकी असल्याने रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यासाठी 20 तारखेपर्यंत शंभरटक्के बंद ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे.