महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद शहरात कोरोना मृत्यूदरात घट, रुग्ण वाढीची गतीही झाली कमी - मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर

महानगरपालिका हद्दीतील सध्या सुमारे अडीच हजार रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. आरोग्य तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, उपचार करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही आता वाढलेली आहे. त्यामुळे लवकरच शहराच्या हद्दीत असलेली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

corona
कोरोना

By

Published : Aug 4, 2020, 8:25 PM IST

औरंगाबाद - शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. मृत्युदर तर कमी झालाच आहे, मात्र त्याचबरोबर मनपा हद्दीमध्ये नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील बर्‍याच प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कुठेतरी कोरोनाची वाढता चाललेली संख्या कमी करण्यात यश मिळाल्याचा दावा मनपाकडून केला आहे.

डॉ. नीता पाडळकर - आरोग्य अधिकारी, औरंगाबाद मनपा

महानगरपालिका हद्दीतील सध्या सुमारे अडीच हजार रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. आरोग्य तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, उपचार करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही आता वाढलेली आहे. त्यामुळे लवकरच शहराच्या हद्दीत असलेली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. अँटीजन तपासणीचा मोठा फायदा होत असून, या तपासणीमुळे नागरिकांमधील आजाराविषयी असलेली भीती कमी होत असल्याचे देखील पाडळकर यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद पहिल्या पाच शहरांमध्ये येऊन पोहचले. महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या, त्यामध्ये नागरिकांच्या तपासणीवर भर देण्यात आले आहे. देशामध्ये लोकसंख्येच्या मानाने सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या शहरांमध्ये औरंगाबाद हे अग्रस्थानी येऊन पोहोचले आहे. केलेल्या तपासणीमुळे मोठा फायदा झाल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरात येणाऱ्या सहा प्रमुख रस्त्यांवर शहराच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये लक्षणं नसलेली मात्र बाधित असलेले साडेतीन हजार रुग्ण आढळून आले. या नागरिकांपासून बाधित होणाऱ्या रुग्णांना वाचवण्यात यश आल्याचं महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितलं. सध्या शहरांमध्ये 18 वेगवेळ्या ठिकाणी आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामध्ये नऊ ठिकाणी फिक्‍स पॉइंट लावण्यात आले आहे, तर न9 रुग्णवाहिका वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन नागरिकांची तपासण्या करत आहे.

इतकेच नाही तर शहरांमध्ये नुकताच नऊ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांची आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची विशेष तपासणी मोहीम ही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये लक्षणं असलेली अनेक रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात लक्षण नसलेली अनेक रुग्ण शोधण्यात यश आले आहे. रुग्णांची संख्या नागरिकांमुळे वाढणार होती ती थांबवण्यात यश आले आहे. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे नव्याने आढळून येत असलेल्या रुग्ण संख्येत घट झाल्याचा दावा मनपाकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या रोज तीनशेने वाढायची, हीच रुग्णसंख्या आता दीडशे ते दोनशेच्यामध्ये आली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी यश येत असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी पाडळकर यांनी सांगितले. इतकंच नाहीतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी जो मृत्यू दर पाचच्या पुढे गेला होता, तो मृत्युदर आता चार टक्क्यांच्या आत आणण्यात महानगरपालिकेला यश मिळाले आहे. रुग्णांची लवकर तपासणी केली जात आहे, लवकर उपचार मिळत असल्याचा फायदा होत असून महानगरपालिका उपाययोजना करत असताना नागरिकांनी योग्य साथ दिली तर निश्चितच औरंगाबाद शहर हे कोरोनामुक्त होईल, असा विश्वास डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details