महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेवारस कारमुळे शहरवासीयांचा उडाला गोंधळ - Aurangabad CIDCO Police

सिडकोतील वसंतराव नाईक चौकात एक बेवारस कार आढळून आली. त्यामुळे पोलिस व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याघटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने कारची तपासणी केली असता, गाडीत काहीच आढळून आले नाही.

गाडीची तपासणी करतांना श्वान पथक
गाडीची तपासणी करतांना श्वान पथक

By

Published : Apr 18, 2021, 6:24 PM IST

औरंगाबाद- शहरातील सिडको भागातील वसंतराव नाईक चौकात एक बेवारस एम एच १६ ए टी ६०३४ क्रमांकाची कार आढळून आली आहे. या गाडीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली होती. त्यामुळे या घटनेची माहिती तात्काळ बॉम्बशोधक पथकाला देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले व गाडीची तपासणी केली. तसेच गाडीची काच फोडून गाडीच्या आतली पाहणी केली. गाडीत काहीच आढळून न आल्याने सगळ्यांनी सुटकेची नि:श्वास टाकला आहे. पुढील कारवाईसाठी ही गाडी सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

शहरात आढळली अज्ञात कार

ABOUT THE AUTHOR

...view details