औरंगाबाद -शहरात विविध पोलीस ठाण्यातील २० पथक पेट्रोलिंग करतात. यातील सिडको पोलीस ठाण्याचे विशेष पथक गस्तीवर होते. दरम्यान, पथकाला आज (शनिवारी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात विदेशी दारू विक्री होत असल्याची खात्रीलायक माहती सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून राहुल राजकुमार जयस्वाल (वय-२८) वर्षे , रा.सुरेवाडी याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण भागात विक्रीसाठी केला होता साठा-
ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने अनेक राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसाठी शहरातून दारू मागवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विदेशी दारू पोहचवण्यासाठी राहुल जयस्वाल याने विदेशी दारूचा साठा तयार केला होता.
खात्रीलायक सूत्रांनी दिली माहिती-
सिडको भागातील शरद चहाच्या हॉटेल जवळील देवगीरी नागरी बँकेसमोर विदेशी दारूचा साठा घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ती उभा आहे, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवान्याची विचारपूस केली. त्याने अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचे त्याने सांगितले.