औरंगाबाद - बाळासाहेब ठाकरेंना किती दैवीशक्ती होती, हे मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. ते आज सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी आले होते.
मी वनमंत्री असताना नॅशनल पार्कमध्ये काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी बाळासाहेबांना घेऊन गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला वाघ पाहायचा आहे, असे म्हटले. त्यानंतर मी त्यांना वाघाच्या पिंजऱ्याजवळ घेऊन गेलो. तेव्हा एका वाघाच्या पिंजऱ्यासमोर बाळासाहेबांनी हात केल्यानंतर वाघाने त्यांच्या हातावर पंजा मारला, त्यांच्या हातात पंजा दिला. त्यावेळी आम्हाला बाळासाहेबांना किती दैवीशक्ती आहे. हे जवळून पाहायला मिळाले, असे खैरे म्हणाले.