महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सत्तार गद्दार! त्यांना शिवसैनिक मातोश्रीच्या पायऱ्या चढू देणार नाही - चंद्रकांत खैरे - chandrakant khaire criticize abdul sattar

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तार समर्थकांनी महाविकास आघाडीला मतदान करावे, यासाठी अब्दुल सत्तार यांना विचारणा केली. त्यावेळी सत्तार यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर राजीनामा फेकला असल्याचे त्यांनी मला सांगितले, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

Abdul Sattar and Chandrakant Khair
अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे

By

Published : Jan 4, 2020, 6:47 PM IST

औरंगाबाद -शिवसेनेचे मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी गद्दारी केली आहे. त्यांना शिवसैनिक मातोश्रीच्या पायरी देखील चढू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्तार गटाने महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याने अध्यक्ष पदावर निसटता विजय तर उपाध्यक्ष पदावर सपशेल हार मानवी लागली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका...

हेही वाचा... 'तमाशामध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, त्यातच पोलीसही पैसे मागतात; मग लोककला जिवंत कशी राहणार?'

अब्दुल सत्तार यांची भेट झाली होती. त्याभेटीत त्यांनी बरच काही बोलून घेतल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. मी माझा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्या समोर फेकला आहे. सिल्लोडमध्ये शिवसेना शून्य आहे, फक्त माझ्यामुळे सिल्लोडमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला, असे सत्तार यांनीच आपल्याला सुनावल्याचे खैरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... शिवसेनेला मोठा धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

चंद्रकांत खैरे हे सत्तार यांच्यावर चांगलेच संतप्त झाले होते. सत्तार हे आज फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे जिंकून आले आहेत. त्यांचे हे वागणे खपवून घेतलं जाणार नाही. अब्दुल सत्तार उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, अशा बातम्या समोर आहेत. मात्र, मातोश्रीच्या पवित्र भूमीच्या पायऱ्या शिवसैनिक त्यांना चढू देणार नाहीत, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.

हेही वाचा... कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेनेच्या सदस्य देवयानी डोणगावकर यांना देखील शिवसेनेने सदस्य म्हणून संधी दिली. जुन्या लोकांचा विरोध अंगावर घेऊन त्यांना अध्यक्ष केले. मात्र त्यांनी देखील आज शिवसेनेसोबत गद्दारी केली. आता बाहेरून येणाऱ्या लोकांना संधी देऊ नका, अशी मागणी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details