महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2022, 7:53 PM IST

Updated : Mar 2, 2022, 8:05 PM IST

ETV Bharat / city

Raosaheb Danve About Coal Scarcity : राज्यात कोळसा टंचाईला राज्य सरकार जबाबदार - रावसाहेब दानवे

कोळसा प्रश्नाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका ( Central minister Raosaheb Danve attack On State Govt ) केली आहे. कोळसा कमी आहे, तर केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही, कोळसा उत्पादनात वाढ झालीये आता कमतरता नाहीये, गेल्या वेळी वातावरणामुळे थोडा फरक पडला होता, आता तसे नाही आहे, वीज कंपनीने नियोजन करायला हवे मात्र त्या करत नाहीत अशी टीका रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve about coal scarcity ) यांनी केली.

Ravsaheb Danve On State Govt
रावसाहेब दानवे

औरंगाबाद - कोळसा प्रश्नाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका ( Central minister Raosaheb Danve attack On State Govt ) केली आहे. कोळसा कमी आहे, तर केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही, कोळसा उत्पादनात वाढ झालीये आता कमतरता नाहीये, गेल्या वेळी वातावरणामुळे थोडा फरक पडला होता, आता तसे नाही आहे, वीज कंपनीने नियोजन करायला हवे मात्र त्या करत नाहीत अशी टीका रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve about coal scarcity ) यांनी केली.

केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

पैसे थकले तरी पुरवठा सुरु -

भारनियमनाबाबत आता राज्य सरकार बोलतय, ती त्यांची जबाबदारी आहे, बाहेरून येणारा कोळसा कमी झालाय, मागणी वाढली मात्र पुरेसा कोळसा केंद्राकडे आहे. नियोजन राज्य सरकारचे नाहीये. त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे. आमच्याकडे मुबलक कोळसा आहे, मागितला तर नक्की देऊ ईडी रावसाहेब दानवे म्हणाले. तर माझे आणि राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचे 5 दिवस आधी बोलणे झाले होते. त्यानुसार त्यांना कोळसा देण्याचा सूचना केल्या आहेत, राज्यावर कोळसा मंत्रालयाची 3 हजार कोटी थकबाकी आहे तरी आम्ही कोळसा देतोय, अडवणूक नाही अस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

'मुंबईकरांना लोकल टिकिटाबाबत लवकरच दिलासा'

मुंबई लोकल एसीकोच बाबत एक कमिटी गठीत केली आहे. एसी तिकीट कमी करता येईल का? की काही दुसरा उपाय आहे. यावर अभ्यास सुरु आहे, आठवड्याभरात या बाबत निर्णय होईल. मुंबईकरांना दिलासा मिळेल असे दानवे यांनी सांगितले. युक्रेन बाबत केंद्र कमी पडले अस राज्य सरकार म्हणतात, सगळे आरोप आमच्यावर करतात. आम्ही प्रयत्न करतोय, विद्यार्थ्यांना बाहेर काढतोय आमची यंत्रणा कमी पडली नाही, आमचे 4 मंत्री तिथं जाऊन बसले आहेत. मी स्वतः रात्री काही मुल येणार आहेत त्यांना घ्यायला जाणार आहे.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टीका केली जात आहे. मात्र त्यांनी किंवा आम्ही जेवढे शाळेत असताना वाचले. त्यावरून रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते. हे आमचे मत आहे आणि हेच आम्ही शाळेत शिकलो आहोत. आता तुमचे काय मत आहे ते तुम्ही मांडाव. मात्र आम्ही जे अभ्यासात शिकलो ते मत व्यक्त केले असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

नवाब मलिक युद्ध जिंकल्यासारखे बाहेर आले -

आमच्यावर आरोप करतात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करतात, मोदी यांची ही चौकशी एकेकाळी सीबीआयने केली आहे. अमित शाह यांची पण केली आहे. आम्ही आरोप केले नाहीत, नवाब मलिक धरून आणला आणि ते हाथ वर करतात जसे युद्ध जिंकून आले, त्यांच्या काळात आमच्या अनेकांची चौकशी झाली आणि आम्ही ओरडले नाही आणि आता एक मलिक पकडला तर आरडाओरड, काही प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे राज्य सरकार उपस्थित करतंय. अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचा -Restrictions more Relaxed : राज्यातील चौदा जिल्ह्याच्या निर्बंधात आणखी शिथिलता, 'ही' ठिकाणे पूर्णतः खुली

Last Updated : Mar 2, 2022, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details