महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लस घेतल्याची खात्री न करता पेट्रोल दिल्याने बाबा पेट्रोल पंप सील; प्रशासनाची धडक कारवाई - कोरोना लसीकरण अपडेट

औरंगाबादमध्ये 'नो लस नो पेट्रोल' (no vaccination no petrol) असं अभियान राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप ( Baba petrol pump aurangabad) सील करण्यात आले आहे.

baba petrol pump sealed in aurangabad over avoided  corona  vaccination
लस घेतल्याची खात्री न करता पेट्रोल दिल्याने बाबा पेट्रोल पंप सील; प्रशासनाची धडक कारवाई

By

Published : Nov 22, 2021, 7:34 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 'नो लस नो पेट्रोल' (no vaccination no petrol) असे आदेश दिले आहेत. मात्र, बाबा पेट्रोल पंप ( Baba petrol pump aurangabad) येथे ग्राहकांनी लस घेतल्याची खात्री न करता पेट्रोल देत नियमांचं उल्लंघन केल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या आदेशाने रविवार (दि.२१) रात्री पंप सील करण्यात आला.

बाबा पेट्रोल पंपार प्रशासनाची कारवाई
लस घेतली असेल तरच सुविधा द्या. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद आहे. यामुळे जिल्हा 26 व्या क्रमांकवर आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत लसीकरण कमी असल्याने चिंता व्यक्त करत लसीकरण वेग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवी नियमावली तयार केली. यात पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रास्त धान्य दुकान व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्राहकांकडे लसीकरण केल्याची खातरजमा केल्यानंतरच सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले होते.दरम्यान बाबा पेट्रोल पंप येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली असता ग्राहकांकडे लस घेतली असल्याची खातरजमा न करताच पेट्रोल दिल जात होतं. यामुळे तात्काळ पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. रविवार दि. 21 रोजी रात्री आठ वाजता सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे, जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे, पुरवठा निरीक्षक विलास सोनवणे यांनी बाबा पेट्रोल पंप सील केला.

ABOUT THE AUTHOR

...view details