औरंगाबाद - पी.एच.डी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीला विभाग प्रमुखांनी पैश्यांची मागणी केल्याचे समोर ( University Bribe Case ) आले आहे. याप्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तात्काळ विभाग प्रमुख उज्वला भडांगे यांना निलंबन केल्याची माहिती दिली ( Dr Ujwala Bhadanage Will Be Supspended ) आहे.
50 हजार रुपयांची मागितली लाच -अंजली घनबहादूर ही विद्यार्थीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ( Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) शिक्षण विभागात संशोधन करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभाग प्रमुख उज्वला भडांगे या अंजली यांच्याकडे वारंवार 50 हजार रुपयांची मागणी करीत होत्या. त्यांच्या मागणी कडे अंजली यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भडांगे यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्रासाला कंटाळून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्यावर कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे अंजली यांनी येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात विभाग प्रमुख भडांगे यांच्या विरोधात तक्रार दिली.