महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मोदी, शाह अनेक ठिकाणी गर्दी जमवतात, त्यांच्यावर कारवाई का नाही?'

गर्दी झाली आणि नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मी चूक मान्य करतो. सर्वांना असलेल्या नियमांनुसार माझ्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

aurangabad mp imtiaz jaleel
aurangabad mp imtiaz jaleel

By

Published : Mar 31, 2021, 5:57 PM IST

Updated : Mar 31, 2021, 6:58 PM IST

औरंगाबाद - काल रात्री दहाच्या सुमारास माझ्या घरासमोर नागरिक जमले होते. याची मला कल्पनादेखील नव्हती. मी बाहेर जाऊन बघितले तेव्हा नागरिक मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी गर्दी झाली आणि नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मी चूक मान्य करतो. सर्वांना असलेल्या नियमांनुसार माझ्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

हेही वाचा -खासदार इम्तियाज जलीलांसह समर्थकांना पडला कोरोना विसर; लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (३०) पत्रकार परिषद घेतली. यात लॉकडाउन स्थगित करण्यात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याबाबतच्या बातम्या पसरल्या. त्यावेळी खासदार जलील यांच्या घरासमोर जल्लोष साजरा झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने केली होती. यावर ते म्हणाले, की प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतर नागरिक माझ्या घराजवळ आले. यावेळी मला कल्पनादेखील नव्हती. घराबाहेरुन आवाज आला. नंतर मी घराच्या बाहेर आलो. त्यावेळी घरासमोर नागरिक जमा झाले होते. जमलेल्या नागरिकांपैकी काही लोकांनी मला खांद्यावर घेतले.

हेही वाचा -निर्णयाचे स्वागत, सरकारलाही जनभावना कळाली आहे - खा. इम्तियाज जलील

'गर्दी जमवली नाही, ती जमली'

माझ्या घरासमोर जमलेली गर्दी मी जमवलेली नसून नागरिक स्वतः माझ्या घराजवळ आले होते. सर्वसामान्यांना जो नियम आहे, त्यानुसार माझ्यावर कारवाई करावी. हा नियम सर्वांनाच असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे अनेक ठिकाणी गर्दी जमवतात, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Last Updated : Mar 31, 2021, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details