औरंगाबाद - शहर गुन्हे शाखेने एका गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी बाळगणाऱ्या व्यक्तीला सापळा रचून अटक केली आहे. फिरोज शेरखान पठाण (रा. आझाद कॉलनी, आयशा मस्जिदीजवळ, करमाड, ता.जि. औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे.
औरंगाबादमध्ये गावठी कट्टा विकणारा अटकेत - चिकलठाणा एमआयडीसी
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक व्यक्ती गावठी कट्ट्याची विक्री करणार होता, या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
गुन्हेशाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चिकलठाणा एमआयडीसी (MIDC) येथील तथागत चौकात एक व्यक्ती मोटारसायकलवरुन अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार होता. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे आणि पथकाने सापळा रचून फिरोज शेरखान पठाण यास अटक केली. या आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. यानंतर आरोपीवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?