महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोशल मीडियावरुन मुंबईच्या तरुणीशी मैत्री, अत्याचार करुन 2 लाखांची फसवणूक

वाळूज परिसरातील बजाजनगर येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत दोन लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया
सोशल मीडिया

By

Published : May 13, 2021, 10:45 PM IST

Updated : May 14, 2021, 12:44 PM IST

औरंंगाबाद -वाळूज परिसरातील बजाजनगर येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत दोन लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत शारीरिक संबंध

रोहन राजेंद्र खाजेकर (वय २८, रा. रामनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणी कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिची औरंगाबाद येथील खाजेकरसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. पुढे रोहन खाजेकर भेटण्यासाठी मुंबईला गेला. नंतर औरंगाबाद येथील मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून तो पीडितेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, तिने नकार दिला होता. दरम्यान, पीडित युवती मार्च महिन्यात बजाजनगर येथील घरी असताना मला डबा दे असे म्हणून रोहन खाजेकर हा पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी पीडिता घरी एकटीच होती. याचा फायदा घेऊन रोहन खाजेकर याने तिच्यावर बलात्कार केला. पुढे मुलीने त्याच्याशी संपर्क साधला असता आरोपीने बोलण्यास व लग्न करण्यास नकार दिला.

दोन लाखांची फसवणूक

दरम्यान, रोहन खाजेकरने २०१९ मध्ये पीडितेच्या मोबाइलवर फोन करून आपल्या आईसोबत तिचे बोलणे करून दिले होते. त्यावेळी खाजेकरच्या आईने पीडितेला सांगितले की, तू मुंबईत जॉब करत आहे. लग्न झाल्यानंतर संसारासाठी पैसे लागणार असल्याने तू दर महिन्याला माझ्या मुलाकडे पैसे पाठवत जा, त्यावर पीडितेने महिंद्रा कोटक बँकेच्या अकाउंटवरून दर महिन्याला दहा ते बारा हजार रुपये पाठवले. एकूण दोन लाख रुपये मुलाच्या खात्यावर पाठवूनही खाजेकर लग्न करण्यास तयार नसल्याचा उल्लेख पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले

हेही वाचा -महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

Last Updated : May 14, 2021, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details