औरंगाबाद -येथे जलआक्रोश मोर्चा हा लोकल लोकांनी काढला होता, मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर नक्की सहभागी झाले असते. परंतु, मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यामुळे लोकल मोर्चात सहभागी व्हावेच असे नाही. अशी प्रतिक्रिया भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होत्या.
राज्यभर पाण्यासाठी काम केले -पाण्यासाठी मी काम केलंय. औरंगाबाद नाही तर जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केले आहे. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. जलयुक्त शिवारात त्यांनी त्रुटी दुरुस्त कराव्यात बंद करू नये, या सरकारने दुष्काळ पहिला नाही त्यामुळं सध्या त्यांना कळत नाही. मोर्चे काढून आम्ही सत्ता बदल केले आहेत, असेच मोर्चे पुन्हा निघाले तर सरकार नक्की बदलेल असा विश्वासही पंकजा यांनी व्यक्त केला आहे.
ओबीसीबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा -ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये, मध्य प्रदेशनंतर आता तसेच काम राज्यात केले तर आपल्यालाही आरक्षण मिळेल, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. हा मोठा गुन्हा आहे ओबीसी आरक्षणाबाबत धोका झाला आहे. मध्य प्रदेशने कसे केले तशी सूचना मी राज्याला केली आहे, मदत लागली तर नक्की आम्ही मदत करू ओबीसी आरक्षण साठी माझी सरकारला विनंती आहे असही त्या म्हणाल्या आहेत.
ओबीसी हा पाठीचा कणा आहे - राज्य सरकारची मानसिकता आरक्षण टिकवून ठेवण्याची नाही अशी टीका पंकजा यांनी केली आहे. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यात सरकार कमी पडतेय असही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, संभाजी राजे जो निर्णय घेतील ती योग्य असेल. त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध आहेत. त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे. असही पंकजा म्हणाल्या आहेत.
हेही वाचा -Hardik Patel : हार्दिक पटेल 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.. लवकरच मोदी-शहा यांची घेणार भेट