महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ajanta road अजिंठा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण, खर्चही वाढला; पर्यटकांचे होत आहेत हाल - ajanta road work

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी महामार्गांवर विमान उतरेल असे स्वप्न बोलून दाखवले आणि त्याप्रमाणे नुकतेच त्यांनी पूर्वांचल येथे विमान उतरवले देखील. तो रस्ता ठरलेल्या वेळेच्या सहा महिन्यांआधी पूर्ण झाला. त्यामुळे, त्याचा वाढणारा खर्च टळला. मात्र, अनेक महत्वाचे रस्ते आजही वेळ होऊनही प्रलंबित आहेत. अजिंठा लेणी (ajanta caves) हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे (ajanta road work) पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

Aurangabad Ajanta road work
अजिंठा रस्ता प्रवाशांना त्रास

By

Published : Nov 20, 2021, 9:42 PM IST

Updated : Nov 21, 2021, 9:56 PM IST

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी महामार्गांवर विमान उतरेल असे स्वप्न बोलून दाखवले आणि त्याप्रमाणे नुकतेच त्यांनी पूर्वांचल येथे विमान उतरवले देखील. तो रस्ता ठरलेल्या वेळेच्या सहा महिन्यांआधी पूर्ण झाला. त्यामुळे, त्याचा वाढणारा खर्च टळला. मात्र, अनेक महत्वाचे रस्ते आजही वेळ होऊनही प्रलंबित आहेत. अजिंठा लेणी (ajanta caves) हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे (ajanta road work) पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. 2017 पासून रस्त्याचे सुरू झालेले काम अद्याप अपूर्ण असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा -Chikalthana Covid Center : इन्शुरन्सच्या पैशांसाठी दाखल केले कोविडचे बोगस रुग्ण? पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गेल्या चार वर्षांपूर्वी झाली रस्त्याची घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या अशा औरंगाबाद ते अजिंठ्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आले होते. चीनचे उपराष्ट्रपती 2015 मध्ये अजिंठा लेण्यांना पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी औरंगाबाद ते अजिंठा या रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती. तत्कालीन अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांनी तातडीने रस्त्याची जळगावपर्यंत पाहणी केली. त्यावेळी डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरी रस्त्याची घोषणा केली.

शंभर कोटींचा रस्ता रखडला

औरंगाबाद ते सिल्लोडमार्गे अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते बोधवड मुक्ताईनगर जळगाव असा रस्ता होणार, अशी घोषणा झाल्यावर 2016 मध्ये कामाला मंजुरी देत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. दीड वर्षात रस्त्याचे दोन टप्प्यांत वर्गीकरण करून अर्धे काम बांधकाम विभागाकडे आणि अर्धे काम रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केले. मुळात हा नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला होता. कधी निधी अभावी तर, कधी कंत्राटदार बदलल्याने काम सुरू होऊन चार वर्षे झाली तरी, काम पूर्ण झाले नाही. आजही रस्त्याचे काम वीस टक्के बाकी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक हजार कोटी रुपये खर्च असलेला हा महामार्ग 2019 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, नियोजन नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामध्ये कोविडचे देखील कारण देण्यात आले, परिणामी रस्त्याला येणारा खर्च 100 कोटींनी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पर्यटकांवर झाला परिणाम

चार वर्षांपूर्वी औरंगाबाद अजिंठा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. काम करत असताना नियोजनाचा अभाव असल्याने, प्रवाशांना मोठे नुकसान सोसावे लागले. अजिंठा जगप्रसिद्ध लेणी असल्याने पर्यटकांची संख्या मोठी आहे, औरंगाबादहून लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना अवघे शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार ते पाच तास लागत होते, त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये रस्त्याबाबत नकारात्मक चर्चा होत होती. येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आणि आर्थिक नुकसानही सोसावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी देखील केली आहे.

हेही वाचा -500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल

Last Updated : Nov 21, 2021, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details