महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2022, 7:51 PM IST

ETV Bharat / city

सगळे प्रयत्न संपल्यावर अखेर कुलसचिव डॉ. सूर्यवंशी यांचा राजीनामा विद्यापीठांत चर्चांना उधान

सगळे प्रयत्न संपल्यावर (After all the efforts) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर तडकाफडकी राजीनामा (the Registrar Dr Suryavanshi resigned) दिला, आणि क्षणातच कुलगुरूंनी तो मंजूर केला. त्यांची कारकिर्द त्यांच्यावर झालेले आरोप त्यानंतर त्यांनी पद वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न यावरुन विद्यापीठात वेगवेगळ्या चर्चा (discussion in the universities) रंगत आहेत.

Dr. Jayashree Suryavanshi
डॉ. जयश्री सूर्यवंशी

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर तडकाफडकी राजीनामा दिला (the Registrar Dr Suryavanshi resigned) आहे. आणि काही क्षणातच कुलगुरूंनी तो मंजूर करत त्यांच्या जागी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी कुलसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ सूर्यवंशी यांच्यावर वेगवेगळे आरोप होत होते. त्यांच्यावर आक्षेप घेतलेल्या संघटनांच्या विरोधातही त्यांनी परस्पर विरोधी तक्रार केली होती. या आरोपांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरी राजीनामा वयक्तिक कारणाने देत असल्याचे त्यांनी सांगितल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.



जातीचा चुकीचा दाखला :डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली. या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ नावाला असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले होते. अशी माहिती समोर आली आहे.

विद्यापीठाचे कारवाईचे संकेत :आरोपानंतर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. इतकेच नाही तर केवळ महिला म्हणून त्रास दिला जात आहे, आपली छेड काढली जात आहे, अशा तक्रारी त्यांनी राज्य महिला आयोग आणि औरंगाबाद पोलिसांकडे केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नव्हता. मंगळवारी विद्यापीठात झालेल्या बैठकीनंतर रात्री अचानक डॉ जयश्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे स्वखुशीने कुलसचिवपदाचा राजीनामा देत असल्याचे सूर्यवंशी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. आता प्रभारी कुलसचिव म्हणून केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा.डॉ. भगवान साखळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या राजीनाम्या नंतर विद्यापीठात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details