महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; ५ ठार, एक गंभीर - AURANGABAD CITY ACCIDENT

नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या परिवाराच्या रिक्षाचा आणि कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यु झाला आहे.

अपघात
ACCIDENT

By

Published : Dec 25, 2019, 12:17 PM IST

Updated : Dec 25, 2019, 4:11 PM IST

औरंगाबाद- नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या परिवाराच्या रिक्षाचा आणि कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन रिक्षामधील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. हा अपघात औरंगाबाद, जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ घडला.

रिक्षाचा आणि कारचा समोरा-समोर भीषण अपघात

दिनेश रामलाल जधाव(32), रेणुका दिनेश जाधव (25), सोहम गणेश जाधव (9), वंदना गणेश जाधव (27), अतुल दिनेश जाधव(6), सर्व रा.नूतन वसाहत,जुना जालना) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

आज सकाळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेने निघालेली (एम.एच.30 ए.झेड.7728) सुसाट वेगातील कार औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ (एम एच.21 बिजी 0107) या रिक्षाला समोरा-समोर धडकली. या अपघातात रिक्षामधील जाधव परिवारातील चार जण जागीच ठार झाले. तर चिमुकला गंभीर जखमी आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील बाजुचा अक्षरशः चुराडा झाला.

हा अपघात पाहून परिसरातील व्यापारी नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना देताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कारमधील जखमी आणि मृतांना बाहेर काढत रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनातून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले. वाहनांमध्ये आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सर्व मृत हे जालना जिल्ह्यातील रहिवाशी असून एकाच परिवारातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Dec 25, 2019, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details