औरंगाबाद - नवीन सरकारने पोरकटपणा केला. मागील सरकारच्या काही विकास योजनांच्या निर्णयाला स्थगिती दिली. औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर केले, नामांतर करताना जातीत व धर्मात भेदाभेद न करता तसेच कुठलाही वाद न करता सर्वांच्या विश्वासाने हे नामांतर केले. त्यामुळे त्यांच्या पोटात दुःखले असेल. त्यांना दंगली घडवून नामांतर करायचं होत. असा आरोप युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray aurangabad ) औरंगाबादेत केला. ( Aaditya Thackeray Criticize shiv sena rebel mla )
राज्यासाठी काम केले -महाविकास आघाडी सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात आणल्या. ६.५ लाख कोटी रूपयांची गुंतवणुक राज्यात आणली. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना ८० वर्षे वयात ५० वर्षीय वयातील माणसांसारखे काम केले अशा शब्दात त्यांनी सुभाष देसाई यांचे कौतुक केले. मराठवाड्यात दुष्काळ होता तेव्हा चारा, पाण्याच्या टाक्या देऊन मदत केली. पालिकेत निधी नसल्याने रस्ते होऊ शकले नाहीत. मात्र आपण ५०० कोटींची कामे मंजूर करून घेतली. पर्यटनासाठी पैसे दिले. अजित पवार यांना सांगून पैसे मंजूर करून आणले. जेवढा कधी निधी मिळाला नाही तेवढा निधी यांना दिला हे मी ठाम पणे सांगेल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दगा का केला? -सगळ केलं तरी सोडून गेलेले आमदार खोटं बोलतात याची खंत वाटते. सगळे नीट चालले असताना गद्दारी का केली. यानांसर्व दिलं आज लिहून घ्या हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे सत्य आहे. शिवसेनेने बद्दल आदर म्हणतात आज त्यांची वाक्य बघा त्यांच्यानातील विष बाहेर येत आहे. इतकं विष कसं आल माहीत नाही. महाराष्ट्र विकास करत होता. यांनी दगा केला कळलं नाही मिठी मारली मात्र यांच्या हातात खंजीर होता. हे माहीत नव्हत. पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे साहेब यांना दोन महिने हलता येत नव्हतं. महाराष्ट्राचे काम थांबू नये म्हणून ते काम करत होते. रोज अपडेट घेत होते. मात्र दुसऱ्या बाजूला गद्दार जमवाजमव करत होते. पक्ष फोडण्याचे धंदे करत होते. पक्ष प्रमुख आपल्या वेदना दूर ठेऊन काम करत होते, तर हे पाप करत होते. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.