महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लसींचा तुटवडा : औरंगाबादेत एकाच दिवसात बंद पडले 77 लसीकरण केंद्र

सोमवार दि. 28 जूनपासून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने 81 लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे मंगळवारी 81 पैकी 77 केंद्र बंद ठेवावे लागले. त्यामुळे अधिकच्या लस उपलब्ध करून देण्याची मागणी आता होताना दिसत आहे.

लसींचा तुटवडा : औरंगाबादेत एकाच दिवसात बंद पडले 77 लसीकरण केंद्र
लसींचा तुटवडा : औरंगाबादेत एकाच दिवसात बंद पडले 77 लसीकरण केंद्र

By

Published : Jun 29, 2021, 10:36 PM IST

औरंगाबाद : कोरोना नियंत्रणाच्या उद्देशाने गतीने लसीकरण करण्याचा निर्णय औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला. त्यासाठी शहरात तब्बल 81 लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आले. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे दुसऱ्याच दिवशी यापैकी 77 केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

एकाच दिवसात लसीकरण केंद्र झाले बंद
सोमवार दि. 28 जूनपासून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने 81 लसीकरण केंद्र सुरू केले. महापालिकेकडे जवळपास सोळा हजार लसींचा साठा उपलब्ध होता. सोमवारी दिवसभरात 15380 लस नागरिकांना देण्यात आल्या. त्यामुळे सहाशेच्या जवळपास लसींचा साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे अपुऱ्या लसींमुळे मंगळवारी लसीकरण मोहिमेला ब्रेक लावावा लागला. परिणामी, सोमवारी सुरू करण्यात आलेल्या 81 पैकी 77 केंद्र बंद ठेवावे लागले. त्यात एका केंद्रावर कोव्हिशील्ड लस तर तीन केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध राहील अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

एकाच केंद्रावर नागरिकांनी केली गर्दी
औरंगाबाद शहरातील कोरोना लसींचा साठा संपल्याने मंगळवारी प्रोझोन मॉल येथील एकाच लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असेल अशी माहिती पालिकेने दिल्याने सकाळी दहा वाजेपासूनच मॉल वाहनतळावर नागरिकांनी गर्दी केली होती. प्रोझोन मॉल येथे ड्राइव्ह इन संकल्पनेतून लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र एकच लसीकरण केंद्र असल्याने सर्वसामान्यांनाही या ठिकाणी लस देण्यात येत होती. परिणामी मोठी गर्दी झाल्याचे चित्र येथे दिसून आले. कोवॅक्सिन लसीसाठी क्रांती चौक आरोग्य केंद्र, राज नगर आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटल एन-४ येथे लसीकरण करण्यात आले. तर दुसरीकडे लसींचा साठा कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती नसल्याने लसीकरण पुन्हा कधी सुरू होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details