औरंगाबाद- जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 44 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1120 झाली असून दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 39 वर पोहचली आहे.
औरंगाबादेत बुधवारी आढळले 44 नवे कोरोना रुग्ण, संख्या 1120 वर - aurangabad corona latest news
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 44 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलीस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. 5 (2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1), असेफिया कॉलनी (1), रहेमानिया कॉलनी (1), टॉऊन हॉल (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.
बुधवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून औरंगाबाद शहरातील रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा पहाटे साडेपाच वाजता तर, इंदिरा नगरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जयभीम नगरातील 55 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 39 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.