महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किरकोळ कारणावरून औरंगाबादेत तरुणाचा भोसकून खून; संशयित ताब्यात - Yash mahindrakar murder case

मित्रा सोबत झालेल्या वादातून सोबत असलेल्या यशच्या मित्रानेच यशच्या छातीत चाकू भोसकला. त्यानंतर ‍मरेकऱ्यानी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात यश यास गंभीर जखमी झाला होता, तशा अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले

21-year-old-boy-killed-by-his-friends-in-aurnagabad
औरंगाबादेत तरुणाचा भोसकून खून

By

Published : Apr 25, 2021, 8:50 AM IST

औरंगाबाद- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील मयूर पार्क भागात एस.बी.ओ शाळेसमोर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा गुन्हा घडला आहे. यश महेंद्रकर (वय २१ नवजीवन कॉलनी एन १२ हडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रानेच हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यश महेंद्रकर हा त्याच्या मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून सोबत असलेल्या यशच्या मित्राने यशच्या छातीत चाकू भोसकला. त्यानंतर ‍मारेकऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला होता, तशा अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संशयिताला घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच सिडको आणि हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलाला संशयावरून ताब्यात घेतलेले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शनिवारी रात्री अकरा वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यश महिंद्रकर यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाली हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details